अंबाजोगाई (बिड - समाजहित न्यूज वृत्तांत) येथे आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पदाधिकारी यांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय व बौद्धांवर अन्याय अत्याचार वाढले असून, अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोरपणे शासन करुन पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच राज्यात कमी प्रमाणात दोन दिवसांचा पाऊस झाला आहे व तो पिकासाठी कमी आहे,झालेल्या कमी पाऊसमानामुळे उद्भवलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतकरी, शेतमजूर, कामगार यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी असे प्रतिपादन डॉ राजेंद्र गवई राष्ट्रीय नेते व राष्ट्रीय महासचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी अंबाजोगाई येथे दिनांक १५/०९/२०२३ रोजी दुपारी झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे बीड जिल्हा बैठकीत महाराष्ट्र शासनाला आवाहन केले.तसेच या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांना मुंबई येथील मंत्रालयात जाऊन शिष्टमंडळाला घेऊन भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.या बैठकीला पंडित टोमके, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रामराम दाभाडे राष्ट्रीय कोष्याध्यक्ष, मिलींद मोकळे कार्याध्यक्ष, माणिक वाघमारे जिल्हा अध्यक्ष, नारायण वाघमारे जिल्हा अध्यक्ष, बाळासाहेब काकडे युवक जिल्हाध्यक्ष, महेंद्र वडमारे शहराध्यक्ष बीड,बब्रुवान सोनवणे, रामराम जोगदंड, प्रकाश घोरपडे, अक्षय सोनवणे, सोमनाथ इंगळे भगवान सरवदे इत्यादी अनेक जण उपस्थित होते.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

