> देवस्थानचा वतीने तहसीलदार रणजित सिंह कोळेकर यांचा सपत्नीक सत्कार <
मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या कोल्हा येथील श्री क्षेत्र त्रिमूर्ती हनुमान मंदिर यशवाडी येथे अनेक ठिकाणा हुन दर शनिवारी मोठया प्रमाणात भविक भक्त येत असतात याच अनुषंगाने मानवत तहसीलचे नूतन अप्पर तहसीलदार श्री. रणजित सिंह कोळेकर यांनी देवस्थानास १७ सप्टेंबर रोजी भेट दिली असता या वेळी त्यांचा श्री क्षेत्र त्रिमूर्ती हनुमान मंदिर यशवाडी देवस्था नच्या वतीने सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या वेळी श्री क्षेत्र यशवाडी देवस्थानचे मुंजाजी भिसे, रामभाऊ भिसे, माधवराव तारे, चांगोजी भिसे, बालासाहेब तारे, नामदेवराव शिंदे यांच्या सह यावेळी देवस्थानचे पदाधिकारी व भाविक भक्त उपस्थित होते.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
