मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील केकरजवळा येथे कार्यरत असणारे श्री. कानू लहिरे यांना आदर्श शिक्षक व समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कहार भोई समाज संघटनेचा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे ०३ सप्टेंबर रोजी तिसरा वर्धापन दिन सोहळा पार पडला या वर्धापन सोहळ्यात मानवत तालुक्यातील मौ. केकरजवळा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक तथा केकरजवळा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. कानू सुंदरराव लहिरे यांना आदर्श शिक्षक व समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) म.न.पा.चे महापौर श्री. नंदकुमार घोडेले व कहार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पंडोरे हिरालाल बिरुटे, सरला बिरुटे, कार्याध्यक्ष कुंदन डिंबर, सचिव सुरेश, घुंगासे, प्रसाद इंदरखे, भगवान कुटारे, नवनाथ कचरे, गोविंद डहारे अंकुश बलैया यांच्या उपस्थित हा पुरस्कार कानू लहिरे यांना प्रदान करण्यात आला त्यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे सर्व अभिनंदन केले जात आहे.
