मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) सध्या मानवत शहरांमध्ये सिमेंटच्या रस्त्याचे जाळे गल्लीबोळा मध्ये झाले असून त्यामुळे मानवत वासियांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे असे प्रतिपादन युवा नेते डॉ अंकुश लाड यांनी केले आहे शहरातील गोलाईत नगर मधील रस्ता उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मानवत शहरातील प्रभाग क्रमांक ०९ मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या रहदारीच्या रस्त्याच्या प्रश्नाचा निपटारा करीत त्याचे उद्घाटन केले. आचार्य महामंडलेश्वर १००८ स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज यांच्या हस्ते रस्त्याचे उद्घाटन झाले. शहरातील मुख्य रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग ६१ ला हा रस्ता जोडला जाईल. गोलाईत नगर येथील हा रस्ता महाविद्यालयाकडे व कोचिंग सेंटर कडे जाणारा मुख्य रस्ता होता या मार्गा वरून हजारो विद्यार्थी ये जा करत असतात. परंतु या मार्गावर खड्डे झाल्याने या विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणी येत होत्या. त्यामुळे हा रस्ता नवीन करावा, अशी मागणी नागरिकां मधून होती. अखेर शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यां साठीच्या या रस्त्याचे उद्घाटन झाले. पुढे बोलताना ते म्हणाले की यापुढे या विद्यार्थ्यांना रस्त्याची अडचण येणार नाही तसेच शहरात रस्त्याबाबतची कोणतीही समस्या असेल तर नागरिकांनी माझा मोबाईल २४ तास कार्यान्वित असतो त्यावर कॉल करून किंवा संदेश करून मला कळवावे त्या रस्त्याचा प्रश्न मी तात्काळ मार्गी लावेल अशी ग्वाही देतो. या कार्यक्रम प्रसंगी राजपुत समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक नरहरी दहे युवा नेते डॉ. अंकुश लाड यांचे सह राजेश्वर दहे, ॲड. किरण बारहाते, ॲड. ऋषिकेश बारहाते, अनंतराव गोलाईत, माधवराव चव्हाण, संदीप जाधव, पांडुरंग नितनवरे, रामभाऊ गोलाईत, ॲड. डि. डी. मगर, अशोक देशमाने यांच्या सह यावेळी जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
