परभणी (प्रतिनिधी शेख अझहर) जालना जिल्हयातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शांततेच्या मार्गाने उपोषण सुरु होते. परंतू उपोषणस्थळी उपस्थित असलेल्या महिला, पुरुष, लहान मुले वयोवृध्द नागरीक यांच्यावर अचानक अमानुष्यपणे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी लाठीचार्ज करुण गंभीर जखमी केले. त्यामुळे या घटनेत आंदोलकावर जे खोटे गुन्हे दाखल केले ते तात्काळ मागे घेऊन अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे, तसेच या घटनेचा जाहिर निषेध करुण मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी एकता हमाल मजदुर युनियनच्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात आला. या वेळी अध्यक्ष रोहिदास अण्णा नेटके, शेषेराव सावळे, तुकाराम कर्वे पाटील, विश्वनाथ कसबे, शाम धुनघव आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
