बीड (समाजहित न्यूज वृत्तांत) येथे दिनांक ०१/०९/२०२३ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे रोजी बीड जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा शाखेच्या पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक जिल्हा अध्यक्ष माणिक वाघमारे यांच्या संयोजनातुन शासकीय विश्रामगृहात दुपारी ३ वाजता संपन्न झाली असुन या बैठकीला पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष, रामराव दाभाडे राष्ट्रीय कोष्याध्यक्ष, जलीलभाई कार्याध्यक्ष आल्पसंख्यांक महाराष्ट्र, मिलींद मोकळे मराठवाडा कार्याध्यक्ष हे प्रामुख्याने उपस्थित होते,या बैठकीला मार्गदर्शन करताना पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष यांनी हरेगाव ता श्रीरामपूर येथील बौद्ध समाजाचे तरुणांवर अत्याचार करणाऱ्यावर कठोरपणे शासन करुन पीडितांना १० लाख रुपये देऊन पुनर्वसन करावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवहाण केले तसेच माण तालुक्यातील मातंग समाजाच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. मराठवाडा विभागातील पाऊस कमी झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा असे निवेदन बीड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन मागन्या चे निवेदन देण्यात आले. बैठकीला मार्गदर्शन करताना पंडित टोमके यांनी कॉंग्रेस राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना मोदी शासन व न्याय व्यवस्थेने लोकसभा सदस्य पदावरून अपात्र केले होते व जीवनातुन उठलेले होते परंतु दिल्ली येथील सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण रा सु गवई व यांच्या तीन सदस्यीय पीठाने राहुल गांधी यांना न्याय दिला व लोकसभा सदस्य पदी बहाल केले असे प्रतिपादन पंडित टोमके यांनी केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खेड्यापाड्यात,वाडी तांड्यावर पोहचवण्यासाठी कार्यकर्ते यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे पंडित टोमके यांनी आवहाण केले.या कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष माणिक वाघमारे, इंदुमती खरात महिला जिल्हाध्यक्षा, बाळासाहेब काकडे युवक जिल्हाध्यक्ष, नारायण वाघमारे जिल्हा अध्यक्ष, प्रकाश घोरपडे, यांच्या सह महिला पुरुष युवक उपस्थित होते.
