परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर ) शहरातील मौजे.पेडगाव या गावातील नागरिकांसाठी दिनांक 3 सप्टेंबर रोजी हिजामा कॅम्प (क्यूपिंग थेरेपी) कॅम्प चे आयोजन केले होते. मुफ्ती इब्राहिम, मुफ्ती शहबाज, अजिम भाई, डाॅ. अश्फाक साहेब (BHMS.MD) यांच्या प्रमुख मार्गदर्शनात कॅम्प यशस्विरित्या पार पडले. सदरील कॅम्पला गावातील युवकांनी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाफिज अरबाज शेख, अनवर खान, शेख समीर व इतर सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
