परभणी (प्रतिनिधी शेख अझहर) दिनांक 12 सप्टेंबर 2023 संभाजी ब्रिगेडच्या एकदिवसीय उपोषणास डॉ. गोविंद कामटे यांनी मराठा समाजला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तो स्वराज इंडिया संघटना व वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र तर्फ उपोषणाला महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण जनजागृती अभियान महाराष्ट्रभर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक नगरात, प्रत्येक कॉलनी, प्रत्येक मंदिरात चालू आहे तसेच परभणी मध्ये अनेक संघटना / पक्षांनी निवेदन देऊन मराठा समाजाला प्रोत्साहन दिले आहे. व परभणी येथील संभाजी ब्रिगेड संघटनेने परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी उपोषणाला भेटी व पाठिंबा करत असताना आज एक दिवशीय उपोषण मराठा समाजासाठी आंदोलन उपोषणाच्या माध्यमातून करत आहेत. त्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या सेवेसाठी राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र प्रणित वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र या दोन्ही सामाजिक संघटनेच्या वतीने पाठिंबा व पत्र श्रीफळ देऊन उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. एक मराठा लाख मराठा ! जय मराठा कुणबी मराठा !! 96 कुळी मराठा, जय लखुजी राजे जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय वारकरी, जय माऊली, जय हरी! अशा घोषणाचा परिसरात जयघोष देण्यात आला आहे. यावेळी मराठा समाजाचे प्रतिनिधी व मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व नेतेगण उपस्थित होते. हा पाठिंबा डॉ. गोविंद कामटे सेलूकर (स्वराज इंडिया संघटनेचे जिल्हा सरचिटणीस तथा सल्लागार राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र.), अँड.निवृत्ती कदम (राष्ट्रजन फाउंडेशन पाथरी विधानसभा प्रमुख), शिवाजी सर्जे (राष्ट्रजन जेसीबी चालक-मालक संघटना परभणी जिल्हाध्यक्ष), प्राणीमित्र गोसेवक नितीन महाराज जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे अध्यक्ष) आदींच्या वतीने देण्यात आला आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
