परभणी (प्रतिनिधी शेख अझहर) जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( आय.टी.आय. ) येथे आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व बार्टी च्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 10 व्या स्मृती दिनानिमित्त वैज्ञानिक दृष्टीकोनावर सहप्रयोग व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विकास आडे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजाजी कांबळे यांनी केले तर प्रयोग सादरीकरण व विश्लेषण अंनिस चे जैश्ठ कार्यकर्ते प्रकाश शिंगाडे यांनी केले. या वेळी महादेव तुरे, संदीप वाघमारे आदींसह महा. अंनिस व बार्टी चे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आय.टी.आय.चे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
