मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील मौ. ताडबोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आजी आजोबा दिन उत्सहात साजरा करण्यात आला. या वर्षी पासून दर वर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर, आणि शाळास्तरावर आजी आजोबा दिन साजरा करण्याचे आदेश शासनाने दिले असून याच अनुषंगाने शाळेत आजी आजोबा दिन साजरा केला गेला. सध्याच्या धाव पळीच्या जीवन शैलीमध्ये पालक त्यांच्या मुलांसाठी त्यांचा संपूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. त्या वेळी कुटुंबात उपस्थित असलेले आजी - आजोबा महत्वाची भूमिका बजावतात आजी - आजोबा ही त्यांच्या जीवन अनुभवा तून अनेक गोष्टी शिकवतात आणि नातवंडांना जीवनाचे महत्त्वाचे धडे देतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यासाठी ताडबोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत 'आजी - आजोबा दिवस' उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्व प्रथम आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले व त्या नंतर कार्यक्रमास सुरवात करण्यात आली यावेळी शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांचे आजी आजोबा शाळेत मोठया संख्येने उपस्थित होते. आले ल्या सर्वाचे स्वागत हे शब्द सुमनांनी करण्यात आले आजी आजोबा यांच्या प्रती जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी हा भावनिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमासाठी ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल सावळे, श्री बलभिम माथेले, उपक्रमशील शिक्षक श्री. नरेंद्र कांबळे, श्रीमती. नंदा शिंदे, श्रीमती. सारीका करंडे, श्रीमती. विशाखा प्रधान, श्रीमती. स्वाती कुकडे, शेख कौसर यांच्या सह यावेळी शाळेतील शिक्षक आणि विदयार्थ्यांचे आजी आजोबा व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

