मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील मौ. रूढी येथील जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थ्यांनी योगासन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. सेलू येथील नूतन विद्याल यात योगा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतुन विदयार्थ्यांची जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत अत्युच्च कौशल्याचे प्रदर्शन करीत निवड झाली आहे. यात शुभम संपत्ती निर्वळ, सोहम प्रल्हाद शिंदे या विदयार्थ्यांनी यश संपादन केले आहे. विदयार्थ्यांना मार्गदर्शन शाळेतील शिक्षक गंगाधर शिंदाळकर यांच्या सह श्री. गंगाधर कंकाळ, श्री. सोपान नाईकनवरे, श्री. उमाकांत हाडूळे, श्रीमती निर्मला घारोळे, श्रीमती. सारिका ढगे, श्रीमती. रोहिणी खोंडे, श्रीमती. माधुरी महाजन यांचे सहकार्य लाभले सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन मानवतचे गटशिक्षणाधिकारी डि. आर. रणमाळे, केंद्रप्रमुख शिरीषजी लोहट, योगगुरु विलास मिटकरी, रूढी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब घनचक्कर, शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करत विदयार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

