मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील मौ. ईटाळी जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत तालुक्यातुन प्रथम क्रमांक प्राप्त करत नावलौकीक मिळवले आहे. तालुक्यातील केकरजवळा केंद्रातील ईटाळी शाळेतील बाल वैज्ञानिकांच्या समुहाने समाजातील अंधश्रद्धा या विषयावर एक नाटिका सादर केली या स्पर्धेत विदयार्थ्यांनी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. निवड झाल्याबद्दल समूहातील बालवैज्ञानिक कु. सीमा खटे, कु. अश्विनी होगे, कु. श्रेया काळे, कु. कार्तिकी करडकर, कु. राजनंदनी होगे, कु. आदिती पाष्टे, प्रथमेश सुरटकर, ज्ञानराज खटे या सर्व बालवैज्ञानिकांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. हरी किशन काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ईटाळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्या ध्यापक श्री. हनुमंत नागरगोजे, शाळेतील शिक्षक श्री. मंगेश मलवाड, श्री. नारायण गोरे, श्री. विलास शिंदे, श्रीमती. मिरा फावडे, श्री. राजेश चव्हाण यांच्या सह गावातील प्रतिष्टीत नागरिक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते सर्व यशस्वी विदया र्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

