सकल मराठा समाजाने दिली होती बंदची हाक; आवाहनाला प्रतिसाद;
गंगाखेड (प्रतिनिधी पठाण अब्दुल रहमान) जालना येथे मराठा समाजावरील आंदोलन कर्त्यावर पोलीसांनकडून लाटी चार्ज कारण्यात आला या घटनेचे पडसाद सर्वत्र उमठले असुन या घटनेचा निषेधार्थ सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी गंगाखेड शहर कडकडीत बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. जालना जिल्ह्यातील अबंड तालुका अंतरवाली सराटा येथे मनोज जरांगे पाटील व समस्त गावकरी याचे मराठा आरक्षणासाठी गेल्या तिन दिवसा पासुन शांततेत उपोषण सुरू होते परंतु पोलीसांनी बळाचा वापर करून उपोषण कर्ते व गावकरी यांच्यावर अमानुषपणे लाठी चार्ज केला आहे. यात काही महिला जखमी झाल्या, या घटनेच्या निषेधार्थ गंगाखेड शहर बंद ची हाक सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली होती. व्यापार्यांनी आव्हानाला प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवून या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. शहरातील व्यापारी पेट सकाळ पासुन बंद ठेउन व्यापार्यांनी या बंद मध्ये सहभाग नौदवला. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडुन नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


