मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत येथील नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात ०५ सप्टेंबर रोजी शिक्षकांचा सत्कार करून शिक्षक दिन साजरा मोठया उत्सहात साजरा करण्यात आला. ०५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षक म्हणजे शिस्त प्रिय, क्षमाशिल, कर्तव्यदक्ष अशा प्रकारे शिक्षकाची ओळख असून ते काटे कोरपणे आपली भूमीका निभावत असतात याच शिक्षक दिनाचे औचित्य साधुन शहरातील नेताजी सुभाष प्राथमिक हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी सर्व प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर विदयार्थ्यांनी शाळेतील शिक्षक श्री. सुभाष डख, बालाजी गोंटे, एस. एन. कच्छवे, बी. एस. तेलभरे, ए. पी. पांढरे, व्ही. टी. चाफेकरंडे, ई. व्ही. मुळे, ए. व्ही. चव्हाण, , एस. के. थोरे, एम. एम. कहात, एस. एम. चंदाले,एस. डी माने, व्ही. आर. होगे, के. एम अबुज, एस. बी. शहा यांचा विदयार्थ्यांनी पुस्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
