> तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कडे तक्रार <
मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील मौ. हमदापुर येथील आरोग्य उप केंद्रात एकही वैद्यकीय कर्मचारी हजर राहत नसल्याची तक्रार येथील नागरिक पांडुरंग कोकाटे यांनी मानवत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे ०४ सप्टेंबर रोजी केली आहे. जीवनातील मूलभूत गरज समजल्या जाणाऱ्या गरजे पैकी एक गरज म्हणजे आरोग्य सेवा होय तसेच ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध व्हावी यासाठी शासनाच्या वतीने प्रत्येक गावपातळीवर आरोग्य उपकेंद्र आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचा माध्यमातून उपलब्ध करून देत आरोग्य सेवा देण्यात आली आहे. परंतु मानवत तालुक्यातील मौ. हमदापूर आरोग्य उपकेंद्रात आरोग्य कर्मचाऱ्या अभावी ही सेवा कोलमडली असून आरोग्य उपकेंद्र सलाईनवर असल्याचे दिसत आहे येथे आरोग्य कर्मचारी नियुक्त असून ही एक ही आरोग्य कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने रुग्णाची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे ही बाब गांभीर्याने घेऊन अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचा ऱ्यावर तात्काळ कारवाई करावी व येथील रुग्णाची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी पांडुरंग कोकाटे यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कडे केली आहे.
