✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचा मानवत तालुकाध्यक्ष पदी श्री. हरिभाऊ पांचाळ
September 15, 2023
0
मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) विश्वकर्मा वंशीय समाज संघटना ही महाराष्ट्रात समस्त विश्वकर्मा वंशीय समाजासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री. नागोरावजी पांचाळ यांच्या मार्ग दर्शनाखाली काम करत आहे. याच अनुषंगाने विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचा मानवत तालुकाध्यक्ष पदी श्री. हरिभाऊ पांचाळ यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे नियुक्ती पत्र त्यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नागोरावजी पांचाळ यांच्या आदेशानुसार व विभागीय सचिव, ज्ञानेश्वर कौसाईतकर, जिल्हाध्यक्ष सर्जेराव कळसकर, अशोक गोंडगे, कपिल उदावंत यांच्या स्वाक्षरीनिशी देण्यात आले आहे. त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन मा. चेअरमन भारत उक्कलकर, मा. सभापती शिवाजीराव उककलकर, जेष्ठ नेते उत्तमराव पिंपळे, अशोकराव उक्क लकर, कांचनराव पिंपळे, संतोष उदावंत, युवासेना तालुका प्रमुख दत्तराव गवळी यांच्या सह मित्र परिवारातून होत आहे.

