मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यात ठिक ठिकाणी बैल पोळा सण पारंपारिक पद्धती ने साजरा करण्यात आला. शेतकऱ्याचा सखा सोबती म्हणून ओळख आलेल्या सर्जा राजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वत्र बैल पोळा सण मोठया उत्सहात साजरा करण्यात येत असतो. परंतु या वर्षी पोळा सण साधे पणाने साजरा करण्याचे जिल्हाधिकारी यांनी व स्थानिक प्रशासनाने आदेशीत केले आहे. सद्या सर्वत्र पशुधनावर लंम्पि डिसिज सारख्या चर्म रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. या मुळे खबरदारीचा उपाय म्हणून या वर्षी पोळा सण हा सार्वजनिक ठिकाणी साजरा न करता आप आपल्या घरीच सर्जा राजाची पारंपारिक रित्या पूजाअर्चा करून पोळा सण साधे पणाने साजरा करावा असे निर्देश जिल्हा प्रसासनाने दिले.
असता याच अनुषंगाने मानवत तालुक्यातील ग्रामिण भागात पोळा सण शेतकऱ्यांनी सर्जाराजाची सार्वजनिक ठिकाणी मिरवणुक न काढता अगदी साधे पणाने आपल्या बैलाची विधिवत पूजाअर्चा करुन अगदी साध्या पद्धतीने पोळा सण तालूक्यातील कृषक शेतकरी बांधवांच्या वतीने साजरा करण्यात आला.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
