मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील मौ. करंजी येथील विद्यासागर हायस्कूल येथे १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिन साजरा करण्यात आला. हिंदी विभाग प्रमुख श्री. डी. आर. इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली मोठ्या थाटामाटात हिंदी दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या सागर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. कल्याण वासेकर होते. यावेळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भाषणात सक्रिय सहभाग घेत हिंदी भाषेबद्दल आपले मत व्यक्त केले. यावेळी शाळेचे शिक्षक श्री. ज्ञानोबा मुरमुरे व श्री. लक्ष्मण गजुलवार यांनी हिंदी भाषेचे महत्व विदयार्थ्यांना सांगितले शाळेच्या विद्यार्थिनी राधिका हरकळ, अनुष्का जाधव, शारदा जाधव, समर्थ जाधव, श्रुतिका जाधव, गायत्री नरवडे, उर्मिला निर्मळ, अनुष्का जाधव, रोशनी निर्मल, अपूर्व जाधव, रुपाली हरकळ, किरण निर्मळ, प्रिया थोरवट, माधवी गायकवाड, जाना जाधव, आरती जाधव, शारदा जाधव आदींनी मनोगत व्यक्त करताना हिंदी भाषेचा अभिमान वाढवला. यावेळी कु. किरण निर्मळ या विदयार्थ्यांनीने हिंदी गौरव गीतावर सुंदर असे नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना जाधव व अनुष्का जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. शेवटी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. ज्ञानोबा इंगळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

