जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे.
मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत) शिवसेनेचे उपनेते व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव (नाना) घोलप यांच्या समर्थनार्थ दादर येथील शिवाजी पार्कवर चर्मकार बांधवांचा बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर नतमस्तक मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांनी केले आहे. हा मेळावा १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे माजी समाजकल्याण मंत्री राहिलेल्या बबनराव घोलप यांनी शिवसेनेच्या उपनेते पदाच्या दिलेल्या राजीनाम्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ लाखो चर्मकार बांधव शिवाजी पार्क येथे जमा होऊन बाळासाहेबांच्या स्मृतीवर नतमस्तक होणार आहेत. महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातील चर्मकार बांधव या ठिकाणी आदरणीय नानांच्या समर्थनार्थ एकवटणार आहे. या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्य़ातील हजारो पदाधिकारी आणि लाखो कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. तरी आपण न चुकता सदर दिवशी शिवाजी पार्कवर उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष श्री. मुरलीधर ठोंबरे यांनी केले आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

