> स्वच्छ सर्वेक्षण २०२४ माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत उपक्रम <
मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत शहरात नगरपालिके कडून पर्यावरण मुक्त गणेश उत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक कोमल सावरे यांनी दिली आहे या स्पर्धेमध्ये मानवत शहरातील सर्व गणेश भक्त सहभागी होऊ शकतात. हि स्पर्धा मानवत शहरातील सर्व गणेश भक्ता साठी लागू राहील. घरगुती गणपती उत्सवाच्या सजावटीसाठी व पथनाट्य स्पर्धा आयोजित केलेले आहे. नागरिकांनी मानवत नगर परिषदे मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. हि नोंदणी कालावधी ११ ते १८ सप्टेंबर २०२३ प्रवेश निशुल्क राहील स्पर्धा कालावधी 19 ते 28 सप्टेबर २०२३ नोंदणीसाठी या स्पर्धेकरीता अधिक माहिती साठी पंकज पवार , शेख वसीम यांचेशी संपर्क करावा असे नगर पालिका प्रशासन कडून सांगण्यात आले आहे. अशी आहेत बक्षिसे स्वच्छ सर्वेक्षण २०२४माझी वसुंधरा अभियान ४.०अंतर्गत पर्यावरण पूरक गणेश उत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक रोख २००१ रुपय व प्रमाणपत्र , द्वितीय क्रमांक रोख १५०१ रुपय व प्रमाणपत्र व तृतीय क्रमांक रोख १००१ रुपय व प्रमाणपत्र या प्रकारे बक्षीस देण्यात येणार असून या स्पर्धेत सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आव्हान मानवत नगर परिषदेचा मुख्याधिकारी तथा प्रशासक कोमल सावरे यांनी केले आहे. या स्पर्धेचे स्पर्धेचे नियम व अटी गणपती सजावट पर्यावरण पूरक पद्धतीची असावी , स्वच्छ व हरित शहर प्रबोधनासाठी देखावे आयोजित करणे , शाडू मातीच्या अथवा धातूच्या गणेश मूर्तीचे प्रतिष्ठापना करणे , श्री जवळील निर्माल्य व पूजेचे साहित्य याचा वापर खत्त निर्मितीसाठी करणे श्री चे विसर्जन पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन नगर परिषदेने तयार केलेल्या कृत्रिम कुंडामध्येकरावे , आपले घर व परिसर स्वच्छ असला पाहिजे , टाकाऊ पासून टिकाऊ सजावट यांचा वापर असावा, प्लास्टिक थर्माकोल इत्यादी पर्यावरणास हानिकारक वस्तूंचा वापर नसावा, सजावटीमध्ये फळांचा व पानांचा वापर करणे , हरित व स्वच्छ शपथ घेणे, उत्सव काळात वृक्षारोपण करणे, स्पर्धा कालवधीत गणपती पर्यावरण पूरक सजावट व कार्याचे केलेले व्हिडीओ अथवा फोटो मानवत नगरपरिषदेच्या समाज माध्यमला टॅग करावे अथवा आयोजकाकडे पाठवावे
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


