> ०४ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत पार पडले प्रशिक्षण <
मानवत / (समजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत नगर पालिकेच्या मुख्यधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने नुकतेच मुख्याधिकारी यांच्या पायाभूत प्रशिक्षणासाठी नागपूर येथे ४ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत पाठवले होते हे प्रशिक्षण पूर्ण करून त्या पुन्हा कामावर परत आल्या आहेत आल्या नंतर त्यांना आता शासनाने प्रशासक आणि मुख्याधिकारी अशा दुहेरी भूमिकेत काम करण्यास कळवले असल्याचे पत्र पाठवले आहे. राज्य शासनाच्या उपायुक्त नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी दिनांक २५ ऑगस्ट अन्वये श्रीमती. कोमल सावरे मुख्याधिकारी मानवत यांना पायाभुत प्रशिक्षण करीता दिनांक ०४.०९.२०२३ ते १५.०९.२०२३ या कालावधीत वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था तथा विभागीय प्रशासकीय प्रशिक्षणसंस्था, (वनामती), व्ही. आय. पी. रोड, धरमपेठ, नागपूर येथे पाठवण्यात आले होते. मुख्याधि काऱ्यांचे पायाभूत प्रशिक्षण म्हणजे मुख्याधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावण्यात या काळात शासन आणि जनता यांचा समन्वय साधत कर आकारणी , स्वच्छता अभियान, नगर पालिका प्रशासन आणि यातून जनतेशी नाळ जोडणे या करिता अशा प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जाते महाराष्ट्र राज्यातील काही निवडक अधिकाऱ्यांची या प्रशिक्षणासाठी निवड झाली होती त्यात मानवत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे यादेखील पाठवल्या गेल्या होत्या त्यांनी नुकतेच हे प्रशिक्षण पूर्ण करून पुन्हा आपल्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार घेतला असून नव्या मिळालेल्या प्रशिक्षणामुळे घनकचरा व्यवस्थापन आणि नागरी पायाभूत सुविधांच्या विकासात झालेल्या सुधारणांबाबत मुख्याधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. या प्रशिक्षण काळा दरम्यानच मुख्याधिकारी सावरे याना दि ०७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी प्रशासक पदाचा चार्ज घेण्याबाबत पत्र दिले असून आता त्यांना मानवत प्रशासक म्हणून देखील आता भूमिका बजावावी लागणार आहे प्रशासक आणि मुख्याधिकारी हे एकाच असल्या कारणाने आता मानवत नगर पालिकाचा कारभार सुरळीत आणि जलद गतीने होईल असे बोलले जात आहे .
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

