परभणी (समाजहीत न्यूज वृत्तांत ) दि.07(प्रतिनिधी) : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून व आंतरवालीतील आंदोलनकर्त्यांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने गुरुवारी (दि.07) परभणीत जोरदार पदयात्रा व निषेध मोर्चा काढला येथील शनिवार बाजारातून या मोर्चास प्रारंभ झाला. त्यावेळी पक्षाचे निरीक्षक तथा माजी मंत्री अनिल पटेल, ज्येष्ठ नेते तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी आंध्रा बँक कॉर्नरपासून मध्यवस्तीतील शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क ते पुढे स्टेशन रोड, नारायण चाळ कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कुच केले. या मोर्चातील संतप्त पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या निष्क्रियते विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. विशेषतः भडकलेल्या महागाईसह अनेक विषयांवर फलके झळकावून नागरीकांचे लक्ष वेधले. तसेच आंतरवालीतील आंदोलनकर्त्यांवर केलेल्या लाठीमाराचाही जोरदार घोषणाबाजी करीत निषेध केला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, देत कसे नाही, मिळविल्याशिवाय राहणार नाही, अशी घोषणाबाजी करीत या मोर्चेकर्यांनी बाजारपेठ दणाणून सोडली. या मोर्चाचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील प्रांगणात समारोप झाला. यावेळी ज्येष्ठ नेतेमंडळींची भाषणे झाली. त्यानंतर जिल्हा प्रशासनास एका शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. या मोर्चात माजी मंत्री पटेल, आमदार वरपुडकर, माजी आमदार देशमुख, प्रा. रामभाऊ घाटगे, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीधरराव देशमुख, पंजाब देशमुख, नाना राउत, गोविंद यादव, दुर्राणी खानम, गणेश देशमुख, निलेश पतंगे, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, खदिर लाला हाश्मी, खमीसा गुलाम मोहम्मद, अतिक उर रहेमान, सुनिल देशमुख, माऊली मुळे, अक्षय देशमुख, रंगनाथराव भोसले, इरफान उर रहेमान खान, जिंतुर तालुका अध्यक्ष गणेश काजळे, हनुमंत डाके, महिला शहर जिल्हाध्यक्ष दुर्रानी, गुलमिर खान, सुहास पंडित, अजय चव्हाण, नागसेन भेरजे, तुकाराम वाघ, मुंजाभाउ गायकवाड, देविदास मुलगिर, बाळासाहेब रसाळ,विनोद लोहगावकर, विनोद कदम, विश्वनाथ थोरे, गणेश देशमुख, अभय कुंडगिर,प्रल्हाद अवचार, सत्तार इनामदार, सिद्धेश्वर लाडाने, गुलाबरावसिरस्कर,देवराव हरकळ , ॲड.सय्यद, ॲड. निखिल धामणगावे, बाबा अवचार, व्यंकटेश काळे, रत्नमाला शिंगणकर, जानूबी, सचिन जवंजाळ, सत्तार पटेल, शेख मतीन, अमोल जाधव, सुरेश काळे, माजी नगरसेवक तांबोळी, सेलु शहराध्यक्ष शेख दिलावर, श्रीकांत पाटील, अभय देशमुख, राजेश रेंगे, दिगंबर खरवडे, सिद्धार्थ लोणकर, सईद वैजनाथ देवकते,अर्जुन वजिर, तहेसिन देशमुख, रोहित घोडगे,आदींसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

