मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे यामुळे मानवत शहरासह ग्रामिण भागातील विविध गणेश मंडळे आणि गणेश भक्त बप्पाचा आगमनासाठी पूर्वतयारीला लागले असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत असून शहरातील अनेक गणेश मंडळानी स्टेज उभारणीचे कामे हाती घेतल्याचे दिसत आहे. गत गणरायाचे आगमन लवकरच झाले होते या वर्षे मात्र गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर रोजी आली असल्यामुळे उशिराने आगमन होणार आहे यामुळे मूर्तीकार कारागीर व गणेश भक्तांना पूर्व तयारीसाठी अधिकचा वेळ मिळाला आहे. त्यामुळे मानवत शहरासह ग्रामिण भागातील गणेश भक्त आणि गणेश मंडळे जोरदार तयारीला लागले असल्याचे दिसत आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी गणरायाचा मूर्ती विक्री साठी उपलब्ध झाल्या असून छोटया मोठया मूर्ती खरेदी करण्याची गणेश भक्तांची रांग पाहवयास मिळत आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

