मानवत तहसील समोर भा. क. प ने केली त्या आदेशाची होळी
मानवत तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन सादर
मानवत / (समाजहित न्यूज वृत्तांत ) कंत्राटी कामगारांची भरती करण्याच्या आदेशाची भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा वतीने मानवत तहसील कार्यालया समोर होळी करण्यात आली व विविध मागण्याचे निवेदन मानवत तहसीलदार यांच्या मार्फत महामहीम राज्यपाल यांना सादर करण्यात आले. यात शासकीय कार्यालयातील कामकाजा साठी कंत्राटी कंपनीच्या कामगारांची भरती तात्काळ रद्द करावी, शासन निर्णय दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजीचा दत्तक शाळा योजनेचा नावाखाली शाळेचे कंत्राटीकरण व खाजगीकरण तात्काळ रद्द करावे, मराठवाडा विभागातील नोकर भारतीचा अनुशेष तात्काळ भरून काढावा आणि एम. पी. एस. सी. मार्फत राज्य शासनाचा अखतरित्या विविध विभाग शासकीय आणि निमशासकीय महामंडळे यादीतील रिक्त पदे आणि शिक्षक भारती तात्काळ सुरु करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या असून दिले ल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने कंपनी मार्फत शासकीय कामकाज करण्यासाठी नऊ कंपन्याना कंत्राट दिले आहे. हा निर्णय पुर्ण पणे गैर संविधानिक असून राज्य सरकारने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा नोकरांचा कंत्राटी करणातून राज्य सरकारने सामाजिक न्यायाचे तत्व नाकारले आहे. या कंत्राटी पद्धतीने शासकिय व्यवस्थेत व कामकाजात भ्रष्ट आणि गैरमार्गाचा अवलंब होण्या ची ही जास्त शक्यता निर्माण झाली असून देशा समोर बेरोजगारीचे अंर्तभूत पूर्व संकट निर्माण झालेले असताना ते कंत्राटी पद्धतीमुळे अधिक व्यापक होत आहे. तर लाखो रुपये खर्च करून शिक्षण संपादन केलेल्या करोडो तरुणांची ही फसवणूक आहे यामुळे देशाचा तरुण निराशेचा गर्तेत सापडला आहे त्यामुळे नोकऱ्याचे कंत्राटीकरण व खाजगीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी या वेळी भारतीय कॅम्युनिस्ट पक्षाचे शहर सेक्रेटरी सुनील वाल्मिकी यांनी केली आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

