स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळेतील विदयार्थ्यांचा सहभाग
मानवत / (समाजहित न्यूज वृत्तांत ) मानवत येथील नेताजी सुभाष विद्यालयाच्या मैदानावर तालुकास्तरीय शालेय खो - खो क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी तथा गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती मानवत यांच्या संयुक्त विद्यमाने २० सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय खो - खो क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन नेताजी सुभाष विद्यालयाचे मुख्याध्या पक श्री. एन. बी. सिसोदिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्याल याचे शिक्षक श्री. उद्धवराव हरकाळ, क्रीडा शिक्षक श्री. विश्वनाथ बुधवंत, श्री. माणिक सिसोदे, तालुका क्रीडा संयोजक श्री. किशन भिसे , श्री. ज्ञानेश्वर रेंगे, श्री. ज्ञानेश्वर ठोंबरे यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत मानवत तालुक्यातील अनेक शाळेंनी सहभाग घेतला होता या मध्ये वेगवेगळ्या गटांत १४ वर्षे मुलीं मध्ये रामेटाकळी येथील ज्ञानोपासक विद्यालयाचा संघ विजयी तर ठरला तर मंगरूळ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शळेचा संघ उप विजेता ठरला १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालय हा विजयी झाला तर मंगरूळ येथील श्री. नरसिंह विद्यालय हा उपविजयी ठरला आणि १७ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये ज्ञानोपासक विद्यालय रामेटाकळी विजयी तर श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालय उपविजयी झाला. १७ वर्षे मुलांमध्ये नेताजी सुभाष विद्यालय मानवत विजयी ठरला तर श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालय मानवत उपविजयी १९ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये के. के. एम. महाविद्यालय मानवत विजयी ठरला आहे. या क्रीडा स्पर्धेतील पंच म्हणून श्री. सचिन सोनवणे, श्री. पंकज पवार, श्री. विशाल धिंगे, श्री. उमेश बारहाते, श्री. पवन कचरे, श्री. शेषराव कटिंग, श्री. धर्मे व श्री. लखन चव्हाण यांनी काम पाहिले. या स्पर्धा पाहण्यासाठी व स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मानवत तालुक्यातील सर्वच शाळेचे विद्यार्थी व क्रीडा प्रेमी व शाळेतील शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच क्रीडा शिक्षक शाळेचे कर्मचारी यांनी परिश्रम परिश्रम घेतले.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


