मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून सण उत्सव उत्साहात साजरा करावे असे प्रतिपादन मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांनी केले. ते १५ संप्टेबर रोजी शहरातील माहेश्वरी मंगल कार्यालयात गणेशोत्सव व ईद ऐ मिलाद कार्यक्रमा निमित्त शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आली होती या प्रसंगी ते बोलत होते. ही शांतता समितीची बैठक पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर मानवत तहसीलचे प्रभारी तहसीलदार रंजीत कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर गावंडे, अशोक ताठे यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी प्रस्तावित केले की गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच गणेश उत्सव मंडळांनी पूर्व तयारी केलेली आहे व सण उत्सव साजरा करणे ही आपली परंपरा आहे उत्सव साजरा करताना शिस्त पाळणे, ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे, श्री गणेश मुर्तीची सुरक्षीत ठिकाणी स्थापना करणे याच प्रमाणे शासनाने दिलेल्या प्रत्येक नियमावलीचे पालन करून हा सण उत्सव साजरा करावे असे यावेळी ते म्हणाले तर हबीब भडके यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणटले की मानवत शहरात मुख्य रस्त्यावर विविध प्रतिष्ठानकडून अन्नदान करण्यात येते व हिंदू मुस्लिम हे सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत असतात असे यावेळी ते म्हणाले तसेच सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना मानवत पोलीस प्रशासना कडून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार असल्याचे ही यावेळी सांगण्यात आले यावेळी सुभाष बारहाते पाटील यांच्या कडून प्रथम पारितोषिक ०३ हजार रुपये तर द्वितीय पारितोषिक ०२ हजार रुपये तर तृतीय पारितोषिक ०१ हजार रुपये असे ठेवण्यात आले. दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी पेठ मोहल्ला परिसरात श्री गणेश भक्तांसाठी पाणपोईची व्यवस्था करण्यात येणार आहे असल्याचे युनुस बागवानवाले यांनी सांगितले या बैठकीस शहरातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, तालुक्यातील पोलीस पाटील, मुस्लिम धर्मगुरू यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सदाशिव होगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पोलीस उप निरीक्षक किशोर गावंडे यांनी मानले. बैठक यशस्वी करण्यासाठी गोपनीय विभागाचे पो. ह. वडकीले व पो. शि. विलास मोरे व त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले बैठकीस शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


