मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत रोड येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धना चा संदेश देणारा पर्यावरण पूरक असा आगळा वेगळा झाडाचा गणपती साकारला साकारण्यात आलेल्या श्रीची प्रतिष्ठापना सार्वज निक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री ना. डॉ. तानाजी सावंत यांचे विशेष कार्य अधिकारी (ओ. एस. डी ) अंकुशराव नखाते, मुख्याध्यापक नितीन लोहट सर, श्री मालपाणी, पर्यवेक्षक सुरेश भिसे यांच्या हस्ते श्रीची आरती करुन प्रतिष्ठानपणा करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवादअंकुश नखाते यांनी संवाद साधला शिस्त हा यशस्वी जिवनाचा पाया आहे असे प्रतिपादन यावेळी अंकुश नखाते यांनी केले. तर पर्यावरणाचा होणारा ह्रास रोखण्या साठी गणेशोउत्सवात लागणाऱ्या मुर्त्या या पर्यावरण पूरक असणे काळची गरज आहे असे मत प्रा. नितीन लोहट यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृक्षप्रेमी शिक्षक राजू वाघ यांनी केले. तर कार्य क्रमाच्या माध्यमातून पर्यावरण विषय क जन जागृती करण्यासाठी व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आणि विदयार्थ्यांनी परिश्रम घेतले.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

