> मानवत तालुक्यातील हमदापूर येथील घटना < विषारी औषध पिऊन संपवली जीवनयात्रा <
मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत )
मानवत तालुक्यातील हमदापूर या गावात राहणाऱ्या २७ वर्षीय शेतकऱ्याने दोन बँकांचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवांचनेतून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० ऑगस्ट रोजी घडली असून या घटनेचा गुन्हा मानवत पोलिसात उशिराने दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मानवत तालुक्यातील हमदापूर या गावात राहणारा शेतकरी रामा बालासाहेब टिपरे व २७ वर्ष हे आपल्या दोन मुले, पत्नी व आई-वडिलांसह गावात राहतो तालुक्यातील वझुर शिवारात त्याना गट नंबर १२ मध्ये अडीच एकर शेती आहे ती शेती ची वहिवाट करून त्याचा उदरनिर्वाह चालतो शेतीतील उत्पन्न कमी असल्याकारणाने त्याने शेतीत काहीतरी जोडधंदा करावा या करिता महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा केकरजवळा यांच्याकडून १ लाख ५७ हजार ५९७ रुपये तर जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा रामटाकळी यांच्याकडून ७४ हजार रुपये असे कर्ज घेतले होते सततची नापिकी होत असल्याने व शेतामध्ये उत्पन्न होत असल्याने रामा टिपरे हे नेहमीच ताणतणावात राहत होते ते नेहमी घरच्यांना बोलून दाखवायचे की शेतामध्ये काहीच उत्पन्न होत नाही आपण बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विचारात ते राहत होते. १० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता जेवण करून सर्वजण झोपले असता शेतकरी रामा बालासाहेब टिपरे हे पहाटचे २ वाजता घरात आढळून न आल्याने त्यांच्या पत्नीने त्यांचा मोठा भाऊ केदारनाथ टिपरे यांना फोन करून सांगितले त्यानंतर पहाटे ३: ४५ वाजता केदारनाथ टिपरे याना कॉल आला की शेतात काही उत्पन्न होत नसल्याने मी कर्ज कसे फेडू या कारणामुळे मी आपल्या शेतामध्ये येऊन विषारी औषध पिले आहे असे सांगून त्यांनी फोन कट केला तेव्हा केदारनाथ टिपरे व त्यांचे मित्र आसाराम शिंदे यांनी लगेच शेताकडे धाव घेतली व रामा टिपरे यांना गावा तील उद्धव शिंदे यांच्या जीपमध्ये टाकून पाथरी येथे खाजगी रुग्णालयातआणले त्या ठिकाणी उपचार न झाल्याने त्यांनी परभणी येथे शासकीय रुग्णालयात पाठवले परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार व्यवस्थित होत नसल्याने परभणी येथील खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान ११ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री १०: १५ वाजता उपचारा दरम्यान मरण पावले ११ ऑगस्ट रोजी शेतकरी आत्महत्या मध्ये शेतकरी मयत झाला तरी ही त्यांच्या घरच्यांची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याने त्यांनी ताबडतोब तक्रार दाखल न करता उशिराने मानवत पोलिसात तक्रार दाखल केली शेतकरी रामा टिपरे यांची पत्नी ऋतुजा टिपरे यांच्या माहितीवरून मानवत पोलिसात आकस्मिक मृत्यू ची नोंद १ सप्टेंबर रोजी करण्यात अली आहे. सध्याची असलेली परिस्थिती व निसर्गाचे लहरीपणा या सर्व बाबीकडे पाहिल्यास सर्वात जास्त भयाण अवस्था हि शेतकऱ्याची आहे या परिस्थितीतुन सावरण्यासाठी शेतकऱ्यांना समुपदेशनाची गरज असून प्रशासनाने या कडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असे दिसून येत आहे तर तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्यामुळे सर्वत्र हळ हळ व्यक्त होत आहे.
