रिपब्लिकन सेनेचे विविध मागण्यांसाठी बेमुद्दत उपोषण
September 07, 2023
0
परभणी ( समाजहित न्यूज वृत्तांत) प्रभावती विद्यालय परभणी येथील सहा शिक्षकांची गैर कायदेशीर भरती करणाऱ्या तत्कालीन शिक्षाण अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखाल करून, ई.डी.मार्फत चौकशी करा. प्रभावती विद्यालयातील गैर कायदेशीर भरती झालेले नम्रता कचरू काळे, शारदा उत्तम पांगरकर, सुकेशन आशोकराव शेळके, मिनाक्षी मुंजाजी उबाळे, जालंदर भागवराव पोले, अमोल शिवाजीराव घोगरे या ०६ शिक्षकांनी कोट्यावधीची शासनाची फसवणुक केल्यामुळे त्यांना सेवेतून कमी करून त्यांच्या विरुध गुन्हा दाखाल करावा. बोगस क्रीडा प्रमाणपत्रात अटक झालेले तात्कालीन अधिक्षक संतोष कठाळे व संबधीत शाळेचे मुख्याध्यापक यांच्या विरुध गन्हे दाखाल करावे. या मागणीसाठी दिनांक 4 सप्टेंबर पासून रीपलिकन सेनेचे शहराध्यक्ष निलेश डूमने हे उपोषणाला बसले आहेत. अद्याप त्या संधर्भात प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप निलेश डूमने यांनी केला आहे.
Tags
