परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर ) जालना जिल्हयातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज व अमानुषतेने झालेली मारहाण या घटनेचा निषेध आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे म्हणून आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळील उपोषण मैदानात धरणे आंदोलन ठेवण्यात आले. या आंदोलनाला परभणी जिल्ह्यातील रहिवासी हिंदू, मुस्लिम, बौद्ध, सिख, कुरैशी, सोनार, समाज व इतर समाजाचे लोक, डॉक्टर, शिक्षक, वकील, विद्यार्थी, महिला, व्यापारी, वासुदेव समाज, शेतकरी, कामगार, मजूर, आणि इतर सर्वांचा मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आले. या आंदोलनाला शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे.

