मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) बैल पोळा सन अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे याच अनुषंगाने मानवत बाजार पेठेत बैल सजावटीचे विविध प्रकारचे साहित्य दाखल झाले आहे. बळीराजाचा सवंगडी म्हणून ओळख असलेल्या बैलाचा आवडता सन म्हणजे बैलपोळा सन होय हा सन अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आसता या सनाचा पार्श्वभूमीवर मानवत बाजार पेठेत बैलसजावटीचे विविध प्रकारचे नक्षीदार झुल, वेसनी, पैंजण, चौरंग जोडी, कासरे, सूत, रंगेबेरंगी बेगड, बैलाचा डोक्यावरील बिल्लोर, आदी साहित्य दाखल झाले असून आपल्या आवडत्या सर्ज्या - राजा चा सजावटी साठी बळीराजा साहित्य खरेदी करताना दिसत आहे. ऐकीकडे बळीराजा अस्मानी संकटा बरोबर सुलतानी संकटाचा सामना करत आहे परंतु असे असताना ही बळीराजा मात्र आपल्या आवडत्या सर्ज्या - राजाचा सजावटी साठी कोणतीही कसर सोडत नसून विविध साहित्य खरेदी करताना दिसत आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

