> मानवतच्या शैक्षणिक प्रगतीचा डंका गोव्यात वाजणार<
मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील तीन शाळांना गोवा येथील विषयज्ञ शिष्टमंडळानी भेटी दिल्या आहेत मानवत गटसाधन केंद्रा अंतर्गत शिक्षण क्षेत्रात चालणा ऱ्या विविध उपक्रमाची माहिती घेण्यासाठी गोवा येथील शिक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या ०९ विषयतज्ञाचे शिष्टमंडळ मानवत येथे भेटीस आले होते या शिष्टमंडळाने वेगवेगळ्या तीन टिम तयार करून तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या यातील एका टिमने मानवत केंद्रीय प्राथमिक शाळा येथील शाळा व्यवस्थापन समिती सोबत चर्चा केली तर दुसऱ्या टिमने तालुक्यातील मौ. मानोली येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन शिक्षण तंत्रज्ञानाचा वापर करतांना लर्निंग नेव्हीगेटर या अँपचे फायदे जाणून घेतले आणि तिसऱ्या टिमने मौ. मांडेवडगाव जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन वर्ग प्रक्रिया समजून घेताना ०१ ते ०३ वेळेत पाठ्यक्रम मुलं कसा पूर्ण करतात हे चर्चेतून माहित करून घेतले. या नंतर या तीनही टिम मानवत येथील गटसाधन केंद्र येथे सुरु असलेल्या गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सामील झाल्या यावेळी कोल्हा केंद्राचे केंद्र प्रमुख प्रकाश मोहकरे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी, उमाकांत हाडुळे यांनी स्पोकन इंग्लिश, तर केकरजवळा केंद्र प्रमुख कान्हू लहिरे यांनी त्रैमासिक पालकसभा, केंद्र प्रमुख श्रीमती. माया जानराव यांनी फोर्ट फोलिओ श्रीमती. कुसुम कच्छवे यांनी परीक्षेनंतरची प्रक्रिया व मेंदूपेटी, आणि मुख्याध्या पक विलास खरात यांनी शाळा विकासात गावाची भुमिका या विषयी सविस्तर व अभ्यासपूर्ण मांडणी केली या बैठकीचे इतिवृत्त लिहिण्याचे व मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन करण्याचे कार्य बालाजी कवडे यांनी केले. या चर्चेत सहभाग घेताना गोवा शिष्टमंडळाने म्हटले की "ही भेट आम्ही करत असलेल्या कार्यासाठी दिशाद र्शक ठरणार" असल्याचे मत यावेळी गोवा शिष्टमंडळाने व्यक्त केले. या चर्चेचा समारोप केंद्र प्रमुख शिरिषजी लोहट यांनी मानवत तालुक्यातील सर्व उपक्रमाचा आढावा घेत केला. तर ग्यानप्रकाश फाउंडेशनचे महाराष्ट्र समन्वयक ओंकार उगले, राहूल खराडे व संदीप जगताप यांनी दोन्ही टीममध्ये समन्वय घडविण्याची भुमिका समर्थ पणे यावेळी पार पाडली बैठकीस बाळासाहेब भिसे, विलास लांडगे, भगवान मोरे, राजेश चव्हाण, आत्माराम पाटील, विलास राठोड, दत्ता सहाणे, संतोष पांचाळ, प्रतोद बोरीकर, गजानन वांबूरकर, संगिता पाटील, सिमा सिसोदिया, सुजाता वाघमारे यांच्या सह मुख्याध्यापक वर्ग व शिक्षक उपस्थित होते.
