मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील मौ. हमदापुर येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी नियुक्ती असून ही मुख्यालयी राहत नसल्याने आरोग्य सेवा कोल मडली आहे संबंधित मुख्यालयी राहत नसलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून आरोग्यसेवा देण्याचे आदेशीत करावे व दोषी कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक पांडुरंग कोकाटे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे. हमदापुर येथील आरोग्य उपकेंद्रात एकूण ०३ आरोग्य कर्मचारी कार्यरत असून यापैकी एकही कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नाही त्यामुळे गावातील वयोवृध नागरिक, गरोदर माता बालक यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे तरी संबंधित कर्मचा ऱ्यांना मुख्यालयी हजर राहुन आरोग्य सेवा देण्याचे तात्काळ आदेशीत करावे अन्यथा अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा ही यावेळी पांडुरंग कोकाटे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

