मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्या निमित्त मानवत नगरपरिषद कार्यालयामध्ये १७ सप्टेंबर रोजी मानवत नगर परिषदेचा प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तसेच ध्वजारोहणा नंतर मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शपथ घेण्यात आली व राज्य गीताचे गायन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास मानवत नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, व शहरातील नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानवत नगरपरिषदेचे कर्मचारी श्री. भगवान शिंदे, श्री. अमोल तांदळे, श्री. मुंजासा खोडवे, श्री. शतानिक जोशी, श्री. संतोष खरात, श्री. संतोष उन्हाळे, श्री. राजेश शर्मा, श्री. पंकज पवार, वसीम शेख, आलिम अन्सारी, रितेश भदर्गे, श्याम दहे, दिपक भदर्गे, सुनील कीर्तने, सचिन सोनवणे, संजय कुरहाडे, मनमोहन बारहाते, हनुमंत बिडवे यांच्या सह नगर परिषदचे सर्व स्वच्छता कर्मचारी कार्यक्रमास मोठया उपस्थित होते.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
