परभणी (समाजहीत न्यूज वृत्तांत ) आंतरराष्ट्रीय जागतिक वाहन चालक दिनानिमित्त परभणी तील सर्व वाहन चालक त्यांचा सत्कार समारंभ संपन्न राष्ट्रजन फाउंडेशन च्या वतीने जेसीबी पॉईंट गावरान जमीन अनुसार टॉकीज समोर गंगाखेड रोड 17 सप्टेंबर हा जागतिक वाहनचालक दिन साजरा करण्याची संकल्पना राज्य शासनाने केली आहे तर आज सर्व वाहन चालकांचा सत्कार करण्यात आला या सत्कारमूर्ती वाहन चालक असलम पठाण पेडगावकर, युवा चालक समीर सय्यद संतोष गिराम , ऑटो चालक अर्जुन शेळके दीपक सोनवणे आयन सय्यद सर्व वाहन चालकांना हार पुस्तक स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रजन फाउंडेशन चे तालुकाध्यक्ष तथा अविराज एजन्सी चे संचालक उद्योजक अच्युतराव तरवटे, कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष भारतीय जनता किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष देवा शिंदे नरसापुरकर प्रमुख पाहुणे राष्ट्रजन जेसीबी चालक-मालक संघटना शहराध्यक्ष जेसीबी मालक रमेश दणदणे , राष्ट्रधन जेसीबी चालक मालक संघटना जिंतूर विधानसभा प्रमुख जेसीबी मालक राम शिंदे आसेगावकर , जावेद भाई आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच शासकीय हॉस्पिटल या ठिकाणी प्रसिद्ध खिचडी वाले गुरुजी यांच्याकडे मोफत खिचडी वाटप करण्यात आली त्या कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर त्यांच्या वतीने आयोजन करण्यात आले व यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले अशी माहिती वाहन चालक मित्र नितीन जाधव गोगलगावकर पत्रकार द्वारे माहिती दिली.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
