> शाळेतील विदयार्थ्यांचा उपक्रम ; विदयार्थ्यांचे पालक व शिक्षकांकडून कौतुक <
मानवत /(समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत येथील आई इंग्लिश स्कुल व आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत विविध उपक्रम राबवण्यात येत असतात या वर्षी ही गणेश उत्सवाचा अनुषंगाने शाळेतील विदयार्थ्यांनी श्री गणेशाची चिखल मातीची मूर्ती, तसेच कागदापासून मूर्ती तयार करुन पर्याव रणपूरक असा मोलाचे संदेश दिला आहे. विदयार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा बनवलेल्या गणपती बाप्पाचा मूर्तीचने पालक व शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले या सर्व विदयार्थ्यांचे पालक आणि शिक्षकांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास आई फाउंडेशन व आई इंग्लिशस्कुलचे संचालक श्री. मुक्तीरामजी गोरे, यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रम यशस्वीते साठी आई इंग्लिश स्कुलचा मुख्याध्या पिका श्रीमती. अभिलाषाताई ठाकूर, सिमाताई रासवे, अनुसयाताई परांडे, अर्चनाताई लाड, अश्विनीताई भिसे, अश्विनीताई कुमावत, वैष्णवीताई सुरवसे, मनिषाताई कदम, अनुराधाताई गोलाईत, वैष्णवीताई माकुडे, अंजलीताई पंडित, राणीताई गोलाईत, मोनिकाताई आतकरे, शबाना शेख, आसाराम गोरे यांच्या सह शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
