मानवत /(समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे आणि ज्या प्रकारे शहरात विकास गंगा आणली आहे त्यामुळे मानवत शहराचा विकासाचा महामेरू डॉ. अंकुश लाड आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही असे शुभ आशीर्वाद महामंडलेश्वर ह. भ. प. १००८ मानिषणांद महाराज यांनी देत आपल्या अमोघ वाणीतून कौतुक करीत डॉ. अंकुशराव लाड यांचा सत्कार करताना प्रतिपादन केले. मानवत शहरातील नारायण नगर येथील अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याच्या महाप्रसादाची यजमानपद डॉ. अंकुश लाड यांनी भूषवले होते या प्रसंगी पंचक्रोशीचे गुरुवर्य अनंत श्री महामंडलेश्वर १००८ स्वामी मनीषानंद पुरी जी महाराज व हटकर समाज बांधवांच्या वतीने डॉ. अंकुशराव लाड यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराच्या वेळी महाराजांनी शुभाशीर्वाद देत डॉ. अंकुश लाड यांच्या कामाचा आढावा घेत त्यांचे कौतुक केले पुढे बोलताना महाराज म्हणाले कि डॉ.अंकुश लाड यांनी जे शहरात विकास कामे केली आहेत ती कामे गेल्या ५० वर्षात झालेले नाहीत मानवत शहराचा चेहरा जो गत काळात अतिशय साधारण होता तो आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा , नगर परिषद प्रशासकीय इमारत , गरुड व दिव्या चैत्यन्य महाराज उद्यान या आणि अशा अनेक बाबीमुळे शहर सुंदर अन स्वच्छ शहर बनले आहे. यावेळी भागवताचार्य माऊली महाराज खडकवाडीकर , कथा यजमान ऍडव्होकेट धारोबा कोकरे , बालाजी बेलनोर , शंकर सोनाजी खताळ , विष्णुपंत बनगर , बाबुराव बनगर , मुंजाभाऊ तरटे , दादाराव दळवे , माजी उपनगराध्यक्ष बाबुराव हलनोर , बबन करे , लक्ष्मण वावरे , नागोराव गडदे , अडवोकेट बबन देवकते , बापूराव हलनोर , अशोक सखाराम शिंदे , राजू वगरे , शंकर वाघमोडे, शामभाऊ कोळेकर , ललित कोकरे व सुधीर कोकरे आदि सह मानवत शहरातील सर्व भाविक भक्त व नारायण नगर मधील नागरिक उपस्थित होते.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

