लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन;
उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार व समाज रत्न पुरस्कार सोहळा संपन्न;
परभणी (समाजहीत न्यूज वृत्तांत ) शहरातील डॉ. आंबेडकर नगर, आय.टी.आय. कॉर्नर येथे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या परभणी जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय एम. देशमुख यांच्या हस्ते दिनांक 7 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले, तदनंतर विविध मान्यवरांच्या संस्थेत आय. डी. कार्ड व नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती कार्यक्रम घेण्यात आले, तसेच पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना समाज रत्न पुरस्कार देणून गौरविण्यात आले, त्यात अनिताताई सरोदे, लता सारंग साळवी, प्रा. राजेंद्र गायकवाड, संजय गायकवाड, रवी साबळे, शेख सरफराज, नंदकुमार कुलकर्णी, सुरेखा खिल्लारे आदी. व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांना उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले, त्यात प्रमोद अशोकराव अंभोरे, ॲड. सुभाष अशोकराव अंभोरे ( दुधगावकर ), शेख अझहर शेख आसिफ, पठाण अब्दुल रहेमान खान, शिवाजी डाखुरे, भारत कनकुटे, प्रदीप लांडगे, राहुल पूंडगे, मोबीन खान, शिवाजी चव्हाण, विजयकुमार कुलदीपके, महेमूद खान, दिलीप बनकर, शिवशंकर सोनूने, राहुल धबाले, देवानंद वाकळे, भीमराव मकासरे, धायजे साहेब आदींना पुरस्कृत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला केन्द्रीय उपाध्यक्ष प्रदिपजी खाडे, कर्नाटक राज्य संपर्क व संघटन प्रमुख सरोजिनी आर्गे, विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख पंजाबरावजी देशमुख, बुलढाणा जिल्हाप्रतिनिधी विश्वप्रभात वृत्तपत्र रामरावजी देशमुख, महाराष्ट्र राज्य संघटन, संपर्क तथा प्रसिध्दी प्रमुख भगिरथजी बद्दर, शिवसेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अनिताताई सरोदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश घनघाव यांनी केले तर प्रास्ताविक दिलीप बनकर व आभार प्रमोद अंभोरे यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मराठवाडा संघटक शिवशंकर सोनूने, सोशल मीडिया मराठवाडा संघटक राजू कर्डीले, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा सचिव प्रमोद अंभोरे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, डिझिटल मीडिया जिल्हा अध्यक्ष राहुल धबाले, आदींनी परिश्रम घेतले. यावेळी संजय घनसावंत, सय्यद जमील, सलीम इनामदार, प्रकाश अंभोरे, बाळूभाऊ घिके, रवि मानवतकर, सुभाष पांचाळ, नंद साहेब, राजकुमार मुंडे, फारूक खान, आनंद अंभोरे आदींचा उपस्थिती होती.
