परभणी (प्रतिनिधी शेख अझहर) शहरातील जुना पेडगाव रोड येथे दिनांक 7 सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमादरम्यान स्वामी विवेकानंद करियर अकादमीचे संचालक प्रा. विठ्ठल कांगणे यांची व माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील विध्यार्थ्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान प्रा. विठ्ठल कांगणे सरांनी विद्यार्थ्यांसोबत मनसोप्त चर्चा करत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगून मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच लवकरच वसतिगृहाला भेट देईल असे आश्वासन दिले.

