सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज यांचा भीमा कोरेगाव मित्र मंडळाच्या वतीने सत्कार
SAMAJHIT NEWS (समाजहित न्यूज)September 09, 2023
0
परभणी (प्रतिनिधी शेख अझहर) शहरातील गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व रुग्णहितार्थ कार्य करणारे तसेच गोरगरीब गरजू लोकांना मदत करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तथा आरोग्य हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांना लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा परभणी च्या वतीने दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी परभणी शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर येथील माता रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वस्तीग्रह येथे आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांच्या हस्ते समाज रत्न पुरस्कार 2023 हा पुरस्कार सन्मानपत्र सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी परभणी शहरातील सामाजिक संघटन भीमा कोरेगाव मित्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ यांच्या हस्ते शेख सरफराज यांना समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल पुष्पहार घालून सत्कार करून सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी संदीप वायवळ, शिवमय्या कोडे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवम कोरडे, समाधीत अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रमोद अंभोरे, राज्य प्रसिद्धी प्रमुख शेख अझहर, प्रशिक वानखेडे, आदर्श खिल्लारे आदींची उपस्थिती होती.