मुंबई (कार्यकारी संपादक ऍड. सुभाष अंभोरे) दि.15 - भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्मियांच्या उद्धारासाठी; भारत देशाला घडविण्यासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांनी समतेचा आणि विश्वबंधुत्वाचा सांगितलेला विचार जगाने स्वीकारला आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांची विद्वात्ता आणि विचार जगाला मार्गदर्शक ठरली आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर नसते तर मी संसदे पर्यंत पोहोचलो नसतो ;लंडन मध्ये ही पोहोचलो नसतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्ही कुठेच नसतो. त्यांच्या नावाने लंडन च्या पार्लमेंट मध्ये मला पुरस्कार मिळत असल्याचा मला अभिमान आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
लंडनच्या पार्लमेंटमध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे आज ना.रामदास आठवले यांचा डॉ.भीमराव आंबेडकर अवॉर्ड 2023 या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला त्यावेळी ना.रामदास आठवले बोलत होते. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा धागा पकडून मी देशभर काम करीत आहे.त्यामुळे हा पुरस्कार मला मिळाला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा पुरस्कार मला लंडन च्या पार्लमेंट मध्ये मिळाला यात गावगवतील माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे अशी कृतज्ञ भावना ना.रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आर्थिकदृष्ट्या सबळ होत आहे. परदेशी गुंतवणूक भारतात वाढली आहे.देश जगात 5 व्या क्रमांकवर आला आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. असे ना.रामदास आठवले म्हणाले. इंग्लंड चे प्रधानमंत्री ऋषी सूनक हे मूळ भारतीय वंशाचे असूनही लंडनच्या जनतेने त्यांना इंग्लंड चे प्रधानमंत्री केले.याबद्दल लंडनच्या जनतेचे अभिनंदन करीत असल्याचे मनोगत यावेळी ना.रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी ऍड.संतोष शुक्ला; जित आठवले; युनाटेड बुद्धिस्ट फेडरेशन चे अविनाश कांबळे; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे चंद्रशेखर कांबळे; तौसिफ पाशा आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
कार्यकारी संपादक ऍड. सुभाष अंभोरे 9284714499

