परभणी, दि. ३ (समाजहित न्यूज वृत्तांत ) येत्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणी महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना उद्या, ४ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. ही प्रभाग रचना महानगरपालिकेचे मुख्यालय, नटराज रंगमंदिर प्रभाग समिती कार्यालय आणि कल्याण मंडपम प्रभाग समिती कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत पाहता येणार आहे. याशिवाय, इच्छुक नागरिकांना [https://pcmcparbhani.org/] (https://pcmcparbhani.org/) या महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील प्रारूप प्रभागांचे नकाशे पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी १५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली असून, त्या मनपा मुख्यालयातील निवडणूक विभाग किंवा संबंधित प्रभाग समिती कार्यालयात दाखल करता येतील, अशी माहिती आयुक्त नितीन नार्वेकर यांनी दिली आहे.

