परभणी (व्यवस्थापक प्रतिनिधी संदीप वायवळ ) राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानें जारी केलेत. त्यानुसार प्रभाग रचनेची प्रक्रिया 11 जून ला प्रभाग गटाची मांडणी सुरु ते 1 सप्टेबर ला अंतीम प्रभाग रचना अधिसुचनाद्वारे प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने एमआयएम पक्षाने आपली भूमीका स्पष्ट करण्यासाठी दि. 14 जून 2025 शनिवार रोजी येथील हॉटेल शैन तंदुरीवाला येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. परभणी महानगर पालीका, सर्व नगरपालीका, नगरपंचायत, ठरावीक काही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका राष्ट्रीय अध्यक्ष बॅ. असदोद्दीन ओवेसी व प्रदेशाध्यक्ष मा.खा. इम्तीयाज जलील यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्धार केला आहे.
परभणी जिल्हयात एम.आय.एमची ताकद वाढविण्यासाठी जिल्हा समन्वयक पदी प्रसिध्द उद्योजक मोहम्मद गौस झैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील निवडणूका लढविल्या जातील. मो. गौस झेन यांना निवडणूकीचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी बऱ्याच निवडणूका लढविल्या आहेत. जसे महानगर पालीका लढवून ते नगरसेवक झाले. त्यांनतर त्यांनी दोनदा परभणी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली. त्यांच्याकडे कार्यकर्त्याची मोठी फळी आहे. त्या जोरावर ते आगामी महानगर पालीका निवडणूका लढवून यशस्वी होतील असा विश्वास यावेळी बोलतांना महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष तथा परभणी जिल्हा निरीक्षक मो. वसीम यांनी व्यक्त केला.
सामाजिक संतुलन अबाधीत राखण्यासाठी एमआयएम पक्षाच्या वतीने नवनिर्वाचीत जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस झैन यांनी मुस्लीम-दलीत-ओबीसी-कुणबी मराठा व इतर वंचीत समाजाला सोबत घेवून आगामी काळात जिल्हयात होऊ घातलेल्या सर्व निवडणूका लढविण्याचे आवाहन केले आहे. नवीन दृष्टीकोणातून सामाजीक सुधारणा केल्याशिवाय प्रस्थापितांना सत्तेतून दुर करणे कठीण आहे. आणि यांना दुर केल्याशिवाय विकास होणार नाही.

