जिंतूर (समाजहित न्यूज वृत्तांत) शेतीच्या वादातून जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे येथील मथुराबाई भिकाजी दराडे वय 65 वर्ष व आसराबाई राजाराम मुंडे वय 60 वर्ष यांचे नावे असलेल्या 6 एकर शेत जमीन हडप करण्याच्या उद्देशाने दिनांक 6 जून 2025 रोजी दगड, काठ्या, लाथा बुक्यानी या दोन वृद्ध महिलेस सोपान राजाराम मुंडे, बेबी सोपान मुंडे, शंकर बाजीराव गुट्टे, नामदेव राजाराम मुंडे यांनी जबर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती मथुराबाई भिकाजी दराडे व आसराबाई राजाराम मुंडे यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे. मथुराबाई भिकाजी दराडे व आसराबाई राजाराम मुंडे यांना मारहाणीत त्यांच्या पायाला, हाताला, डोक्याला,पोटाला गंभीर मार लागलेला असून त्यांच्यावर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरु आहे. मिळालेल्या माहिती नुसार मारहाण करणाऱ्या आरोपी विरुद्ध पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा गुन्हे नोंद करण्यात आले नाही.

