81 मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा 21.20 लाखांचा मुद्देमाल जप्त
परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) दिनांक 22 मे 2025 रोजी रात्री 02.21 ते 03.10 वा.चे दरम्यन परभणी शहरातील वसमत रोड वरील एसएस मोबाईल शॉपीचे शटर वाकवून दुकानात प्रवेष करून दुकानातील मोबाइल्स व अॅसेसरीज असे एकूण 33.98,340/- रू किमतीचा माल चोरून घेवुन गेले वगेरे तकारीवरून पोस्टे नवा मोंढा, 212/2025 कलम 331 (4) 305.3(5) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघड करून आरोपी अटक करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी स्थागुशा ला मार्गदर्शनपर सुचना देवून गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते. त्यावरून पो.नि. स्था.गु.शा. यांनी तात्काळ स्था.गु.शा. चे एक पथक सदर गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी नेमले. सदर गुन्ह्याचा तांत्रीक पध्दतीने तपास सुरू केला असता सदर गुन्हा हा अकबर खान हबीब खान रा. मालेगाव याने व त्याचे साथीदारांसह केला असल्याचे व तो मालेगाव जि. नाशिक येथे असल्याची गुप्त बातमी मिळाल्यावरून स्था.गु.शा. चे पथक मालेगांव येथे रवाना करून खालील आरोपींना मोठ्या शिताफीने सापळा रचून
१. उमाईस अहमद शाहेद अख्तर वय-१९ वर्ष, रा. कुवैत इस्लाम मस्जिद जवळ, मालेगाव जि. नाशिक
२. साकेब अंजुम निहाल अहमद, वय-२५ वर्ष, रा. कुवैत इस्लाम मस्जिद जवळ, मालेगांव जि. नाशिक
३. मुदसिर अहेमद मुदीर अहेमद वय-२० वर्ष, रा. पवारवाडी मालेगाव जि. नाशिक
४. अकबर खान हबीब खान, वय ३८ वर्ष, रा. पवारवाडी मालेगाव जि. नाशिक
५.खैसर खान हबीब खान पठाण, वय-२३ वर्ष, रा. पवारवाडी मालेगाव जि. नाशिक सदर आरोपीतांकडून गुन्ह्यात चोरलेले 81 मोबाईल, साऊंड बार व गुन्हा करण्यासाठी चोरून आणलेले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH04-FP-5846 असा एकूण 20,21,714/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीतांना पुढील तपासकामी नवामोंढा पोलीस स्टेशन येथे हजर केले असता. तपासीक अधिकारी यांनी सदर आरोपींना मा. न्यायालया समोर हजर केले असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देखील मंजूर झालेली आहे. सदर आरोपीतां कडून खालील प्रमोण गुन्हे केल्याची माहिती मिळालेली आहे.
1. पेठ पोलीस स्टेशन जळगाव गुरेन 104/2025 कलम 305,331(4), (3),B.N.S
2. रमजानपुरा पोलीस स्टेशन मालेगाव गुरंन 48/2025 कलम 303, (2), B.N.S
3. शिवाजीनगर पोलीस स्टेशन नांदेड गुरेन 69/2025 कलम 331(4), 305, (Α), Β.Ν.S
4. शेहर पोलीस स्टेशन मालेगाव गुरंन 84/2025 कलम 305,331(4),305 (1),B.N.S
5. पवारवाडी पोलीस स्टेशन मालेगाव गुरंन 205/2024 कलम 118(2), 189(2), 191(2), 190.(3), Β.Ν.S 6. पोलीस स्टेशन येवला शहर जिल्हा नाशिक गुरंन 388/2024 कलम 305, 331(4), B.N.S. सदर कारवाई पोलीस अधीक्षक परभणी श्री. रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात, अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, स.पो.नि.श्री. राजू मुत्येपोड, पोलीस अंमलदार मधूकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शेख रफियोद्दीन, दिपक मुदिराज, रणजीत आगळे व सायबर पो.स्टे. चे गणेश कौटकर यांनी नाशिक ग्रामीण पोलीसांचे मदतीने केली आहे.

