परभणी ( समाजहित न्यूज वृत्तांत ) आज दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी स्थानिक गुन्हेचे पथक कार्यालयात हजर असंतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मीळाली की मौजे नांदखेडा येथील सराईत गुन्हेगार नामे शेर खान पठाण व त्याचे काही मीत्र हे त्याचे राहते घरी व तो वापरत असलेल्या काळ्या रंगाचे गाडीमध्ये धारदार हत्यार व अग्नी शस्त्र (गावठी कटटा) बाळगुन असून ते काहीतरी गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत असल्याचे माहीती कळवीली. सदर ची माहिती पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांना दिली असता त्यांनी तात्काळ स्था.गु.शा. चे पथक तयार करून मार्गदर्शक सुचना व कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरुन पोनि स्था.गु.शा. श्री. विवेकानंद पाटील, व त्यांचे पथकाने नांदेखडा येथे शेर खान पठाण या सराईत गुन्हेगारास मोठ्या शिताफीने सापळा रचून पकडले असता त्याचे सोबत आणीखीन एक सराईत गुन्हेगार नामे हनुमंत रमेश सोनटक्के वय २१ वर्ष रा. वाणी पिंपळगाव ता. पालम जि. परभणी हा देखील मिळून आला त्याचे ताब्यातील स्कॉर्पीयो कार क्रमांक MH23AR2939 मध्ये घातक अग्नीशस्त्र व तलवार मिळून आले व त्याचे घराची घरझडती घेतली असता घरात देखील घातक शस्त्र मिळून आलेत. आरोपीचे स्कॉर्पीयो कार क्रमांक MH23AR2939 मध्ये व घरात असे मिळून 1 अवैध अग्नी शस्त्र, 4- जिवंत काडतूस व 3 तलवारी, 1-खंजर, 1-गुप्ती, 1 कत्ती व 1- रॉड असे मीळून आले. सदर घातक शस्त्र व चारचाकी वाहन असा एकूण 10,37,200/- मुद्देमाल मिळून आल्याने त्यांच्या विरूध्द पो.स्टे. परभणी ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीतां विरूध्द यापूर्वी पुढील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. 1) शेरखान उर्फ शेरु संमदरखान पठान वय 23 वर्ष रा. नांदखेडा ता. जि. परभणी- 1-चूडावा पो. स्टे. गुरांन 62/24 कलम 143, 147, 148, 149, 294, 323, 324, 447, 506 भादवि 2-मोंढा पोस्टे गुरंन 206/2022 कलम 364, 307, 326, 342, 504, 506, 34 भा द वि 3- पूर्णा पोस्टे गुरंन 31/2023 कलम 324, 323, 504, 506, 34 भा द वि 4-परभणी ग्रामीण पो. स्टे, गुरन 213/2020 कलम 323, 324, 504, 34 भादवि 4) पोस्टे nanalpeth. Cr no 403/2023 कलम 307,143,148, 149 ipc r/w 3/25 भारतीय हत्यार कायदा 2) हनुमंत रमेश सोनटक्के वय 21 रा. वाणीपिपळगाव ता. पालम जि. परभणी 1 चूडावा पो. स्टे. गुरांन 62/24 कलम 143, 147, 148, 149,294,323,324,447,506 भादवि. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. स्था.गु.शा. श्री. विवेकानंद पाटील, स.पो.नि. राजीव मुत्येपोड, पोउपनि गोपिनाथ वाघमारे, पोलीस अंमलदार मधुकर चटटे, हाणमंत जक्केवाड, सुग्रीव केन्द्रे, निलेश भुजबळ, जमीरोद्दीन फारोखी, रविकुमार जाधव, सूर्यकांत फड, जयश्री आव्हाड, शेख रफीयोददीन स्था.गु.शा. परभणी व पो.स्टे. परभणी ग्रामीण चे पोउपनि गडदे व अंमलदार कादरी पो.स्टे. सायबर चे गणेश कौटकर यांनी मिळून केली.

