कायमस्वरुपी,नियमित सेवा केंद्राचा प्रांतपाल ला.डाॅ. गिरीशजी सिसोदिया यांच्या हस्ते भव्य उदघाटन सोहळा संपन्न !
परभणी - लायन्स क्लब परभणी व ' कौसर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परभणी ' यांच्या संयुक्त विद्यमाने महिन्यातून एक दिवस परभणी मध्ये कर्करोग तपासणी व उपचार मोफत करण्यात येणार आहेत. कायमस्वरूपी असलेल्या या उपक्रमाचे, लाॅयन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 32 34 एच 2 चे प्रांतपाल पीएमजेएफ लायन डाॅ. गिरीशजी शिसोदिया यांच्या हस्ते भव्य सोहळ्यात उदघाटन पार पडले.
परभणी येथील मौलाना आझाद रोडवरील कौसर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये दि. 17 फेब्रुवारी 2025 रोजी लायन्स क्लब परभणीचे अध्यक्ष एमजेएफ लायन पंडित बरदाळे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली.
गरजू रुग्णांसाठी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. सालेहा कौसर,प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.राहुल राठोड,डॉ.मनोज मोरे ( सिव्हील हॉस्पिटल परभणी ) हे तीन डॉक्टर महिन्यातून एक दिवस या उपक्रमासाठी आपली सेवा मोफत देउन कर्करोग निदान व उपचार सुध्दा करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी परभणीचे ला शंकर गुजराथी, ला. प्रवीण गोलेछा, ला. झेड.आर.मुथा, लॉ.नीरज पारख ,लॉ अरुण टाक अध्यक्ष परभणी मेन,ला.उल्हास नाव्हेकर अध्यक्ष लायन्स क्लब प्रिन्स ला.सतीश चौधरी कोषाध्यक्ष, रिजन चेअर पर्सन,एमजेएफ प्रिया ठाकूर,झोन चेअर पर्सन शिवकुमार,झोन चेअर पर्सन तुषार मराठे, ला.सुभाष इंगळे, ला.मेघशाम चौधरी ला माधव मंडगे,ला. शेवटे, ला. खानापुरे,ला.रसकटला, ला. कानडे, ला.भगवान पुरणे, ला. मंगला मुदगलकर, डॉ.अब्दुल सलीम तसेच धर्मभूमी चे संपादक, जेष्ठ पत्रकार तथा इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,मदन (बापू )कोल्हे, वैभवज्वाला चे संपादक तथा ' इरा ' ची मीडिया चीफ देवानंद वाकळे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ.सालेहा कौसर यांनी गर्भाशयाच्या कर्करोगा संबंधीचे अनुभव कथन केले . त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रांतपाल एमजेएफ ला.गिरीषजी सिसोदिया यांनी डॉक्टर सालेहा कौसर यांच्या,गेल्या 36 वर्षापासून वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांचा, लायन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे मानाचा पुरस्कार व सन्मान चिन्ह पिन देऊन गौरव केला .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ला. शेवटे यांनी केले.

