परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) दि. 09 मार्च 2025 रोजी जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद, परभणी यांच्या मार्फत श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर दिव्यांग मुलामुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. सदरील स्पर्धेत स्वा. सै. कै. रामराव कान्हेकर निवासी अपंग प्रशिक्षण केंद्र परभणी या कार्यशाळेतील विद्यार्थी विकास सावंत, पिराजी मिरासे, धूपदा ठोंबरे, शिवनंदा राठोड, बाबूराव अब्दगिरे, गणेश तनपूरे, दुर्गा दळवी हे विद्यार्थी प्रथम क्रमांकानी विजयी झाले. स्पर्धेत सर्वाधिक प्रथम पारितोषिक मिळाल्याने सदरील कार्यशाळेस जिल्हास्तरीय चॅम्पीयन ट्रॉफी मा. श्री प्रल्हाद लांडे साहेब (अपंग विभाग प्रमुख, जि.प. परभणी) यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ. मनिषा कुलकर्णी या उपस्थित होत्या. सदरील स्पर्धेकरीता कार्यशाळेचे मुख्याध्यापक श्री. देवीप्रसाद जोशी, श्री विजय राखे, श्री. कळसकर राधेशाम, श्री. कुंडलीक राठोड, श्री. मनोहर ढोले, श्री. प्रकाश चव्हाण, शेख जोशी, श्री कळसकर मुस्तफा, सी. सिता कदम, श्रीमती घेवारे व श्री. शंकर फुटके या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व कर्मचाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. मिलींद कान्हेकर यांनी अभिनंदन केले.

