परभणी ( समाजहित न्यूज वृत्तांत) जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या विद्युत मोटार चोरी गेल्या होत्या या गोष्टींची गांर्भीयनि दखल घेत पोलीस अधीक्षक परभणी श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी स्था.गु.शा.चे पो.नि.श्री.पाटील यांना आदेश व सुचना देवून सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्यास आदेशीत केले होते. त्यावरून स्था.गु.शा. चे वेगवेगळे पथक तयार करून गुन्ह्याची माहिती काढण्या करीता रवाना झाले. दिनांक 14/03/2025 रोजी सदर गुन्ह्याची माहिती काढत असतांना पथकास गोपनिय व खात्रीशीर माहिती मिळाली की, आरोपी सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1) पांडू गुलाब काळे, वय 30 वर्षे, रा. मंगरूळ ता. मानवत हा त्याचे राहते घरी व आरोपी 2) श्रावण अन्ना काळे, ता.तांबसवाडी, ता. जि.परभणी हा त्याचे शेतात आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदारांनी वरिल दोन्ही ठिकाणी सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांचे गुन्हा करतांनाचा साथीदार आरोपी 3) संतोष सचिन पवार, वय 23 वर्षे रा.मंगरूळ याचे सोबत केल्याचे सांगीतल्या वरून त्यास बालू काळे याचे आखाड्यावरून ताब्यात घेतले. सदर तीनही आरोपींना ताब्यात घेतले असता आरोपी 1. पांडू गुलाब काळे राहणार मंगरूळ, 2. श्रावण अण्णा काळे राहणार तांबसवाडी व 3. संतोष सचिन पवार राहणार मंगरूळ यांनी खालील प्रमाणे गुन्हे केल्याची माहिती दिली.
1 मानवत गु.र.नं. 93/25 कलम 303(2), 3(5) बी एन एस
2 दैठना गु.र.नं. 336/24 कलम 303(2), बी एन एस
3 दैठना गु.र.नं. 414/24 कलम 303(2), बी एन एस
4 गंगाखेड गु.र.नं. 757/24 कलम 303(2), बी एन एस
असे एकूण चार गुन्हे उघड झाले असून नमूद आरोपींनी सदर गुन्ह्यातील मुद्देमाल विद्युत मोटार, वायर व स्टार्टर असा आरोपी 4) विशाल अंबरसिंग ठाकूर यास भंगारचे भावात विकल्याची माहिती दिली. त्यावरून सर्व चारही आरोपींना व आरोपींनी मोटार विकून मिळवलेले पैसे 35,000/- रुपये नगदी असा मुद्देमाल पुढील तपास कामी पोलीस ठाणे मानवत येथे हजर केला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक परभणी श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे नेतृत्वात पो.नि.स्था.गु.शा. श्री. विवेकानंद पाटील, स.पो.नि.श्री.राजीव मुत्येपोड, पोउपनि श्री. अजित बिरादार, श्री. गोपिनाथ वाघमारे, श्री. चंदन परिहार, पोलीस अंमलदार, मधूकर चट्टे, जक्केवाड हनमंत, निलेश भुजबळ, सुग्रिव केंद्रे, जमीर फारोखी, रवि जाधव, हुसेल पठाण, मधूकर ढवळे, संजय घुगे यांनी मिळूल केली.

