परभणी, दि. 6 (समाजहित न्यूज वृत्तांत ) : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद व दिव्यांग शाळा व कर्मशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. 9 मार्च 2025 रोजी परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालय येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन 9 मार्च रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहूल गिते इ. उपस्थित राहणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरणाचा सोहळा 9 मार्च रोजी सांयकाळी 6.00 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोन्सीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे इ. उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्रीमती एस.के. भोजने यांनी केले आहे.

